नमस्कार, शेतामध्ये विजेची सोय नसल्यास डिझेल पंप खूप फायदेशीर आहे. शेतीला पाणी देण्यासाठी डिझेल पंपचा उपयोग करता येतो. सरकार शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी साठी अनुदान देत आहे. 2022 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्जांची मागणी केली जात आहे.
डिझेल पंप अनुदान योजना 2022
डिझेल पंप अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले जात आहेत. महाराष्ट्र मध्ये महाडीबीटी पोर्टल वर या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज शेतकऱ्यांकडून मागवले जात आहेत. ज्या शेतकर्यना डिझेल पंप घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर महाडीबीटी पोर्टल ओपन होईल या शेतकऱ्यांनी सुरुवातीला त्यांचे प्रोफाईल बनवावे. प्रोफाइल बनवल्यानंतर कृषी सिंचन योजना अंतर्गत इंजिन मोटर या अंतर्गत डिझेल पंप उपघटक का साठी अर्ज करावा.