घरावरील सोलर पॅनल योजना
मित्रांनो पुन्हा वाढला की विजेची मागणी वाढते. पंखे, कुलर सतत चालू असतात त्यामुळे उन्हाळ्यात विजेचे बिल जास्त येत. विजेचे बिल कमी यावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी सोलर प्लांट हा पर्याय आहे.
आपल्या देशात घराच्या छतावर किंवा गच्चीवर सोलर पॅनल बसवणं अगदी सोप आहे. सरकार सौर ऊर्जेसाठी प्रोत्साहन देते. सरकारकडून त्यासाठी अनुदान दिले जाते. सौर ऊर्जा प्रकल्पावर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान दिल जात.
एका किलोवॅट सोलर प्लांट बसवायला अंदाजे 38 हजार रुपये खर्च येतो यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने 15 हजार 200 रुपये अनुदान मिळतं आणि राज्य सरकारच्या वतीने 15 हजार रुपये अनुदान दिलं जातं म्हणजे एकूण मिळून रुपये 30200 अनुदान दिले जाते यामध्ये ग्राहकाला फक्त 7800/- रुपयांचा खर्च करावा लागेल.
तुम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प जर तुमच्या घराच्या छतावर बसून घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता सरकारच्या यादीत असलेल्या विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून घेऊ शकता.