नशा मुक्त भारत मोहिमेसाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून एमसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) मध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे तीन हजार नव्या अधिकाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव एनसीबी ने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता. यापैकी अठराशे अधिकाऱ्यांच्या भरतीला गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
एनसीबी मध्ये मोठी भरती निघणार, १८०० जागांना मंजुरी
ही भरती लवकरच करण्यात येईल त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी या भरतीच्या तयारीची सुरुवात आतापासूनच केली पाहिजे असे सांगण्यात येत आहे.
गेल्या तीन वर्षात अमली पदार्थाच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली असून त्या व्यवहारांना चाप लावण्यासाठी मध्ये म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये लवकरच १८०० नव्या अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. सध्या देशात एनसीपी ची अवघे अकराशे अधिकारी असून या भरतीमुळे अमली पदार्थ विरोधी कारवायांसाठी एनसीबी ला मोठे बळ मिळणार आहे.