प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना मोदी सरकारने 2015 मध्ये चालू केली. सर्वसामान्य लोकांना विमा संरक्षण मिळावे या उद्देशाने ही योजना चालू करण्यात आले आहे. या योजनेमध्ये फक्त 330 रुपयांमध्ये दोन लाखांचे विमा संरक्षण मिळते.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना या योजनेमध्ये लोकांना फक्त 330 रुपयांमध्ये दोन लाखाचा विमा संरक्षण मिळते. या योजनेमध्ये 330 रुपये प्रत्येक वर्षी 31 मे च्या अगोदर बँक खात्यामध्ये कट केले जातात. ही योजना 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती चालू करू शकतात. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबात दोन लाख रुपये दिले जातात.
महत्वाचे मुद्दे.
18 ते 50 वयोगटातील व्यक्ती या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
या योजनेमध्ये वार्षिक 330 रुपये बँक खात्यामधून कट केले जातात.
विमाधारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबास दोन लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाते.
ही योजना कोणत्याही सरकारी बँकेमध्ये किंवा एलआयसीमध्ये ही चालू केले जाते.
व्यक्तीच्या 55 वर्षानंतर ही योजना संपुष्टात येते.
सर्वसामान्य गरीब लोकांसाठी ही योजना खूप फायद्याचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, आणि आयडेंटी साईज फोटो ही कागदपत्र लागतात. ही योजना कोणत्याही सरकारी बँकेमध्ये चालू करता येईल.