राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारापर्यंत चे अनुदान जाणून घ्‍या संपूर्ण माहिती


नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पन्नास हजार पर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. 

राज्यातील नियमित कर्जफेडकरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारापर्यंतचे अनुदान 

महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करत असतानाच हे यंदाचे वर्ष महिला शेतकरी शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी कृषिक्षेत्र हाच विकासाचा पाया आहे यावर सरकारचा विश्वास आहे असे सांगितले. त्यामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी तीन हजार कोटींची भरीव तरुदत केली आहे.


कर्जमाफीचा लाभ या संदर्भात अभ्यास करण्यासाठी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन केले होते नियमित कर्जदारांना पन्नास हजाराची प्रोत्साहनपर अनुदान देताना कोणत्या वर्षातील आणि कोणत्या शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत थकबाकीत नसलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळू शकतो असे सांगितले जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post