काय आहे 'अग्निपथ' योजना
केंद्र सरकारने लष्करात अल्पकालीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सरकारने याला 'अग्निपथ योजना' असे नाव दिले आहे. या योजनेनुसार, तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल, ज्यांना अग्निवीर म्हटले जाईल.
या योजनेंतर्गत भरती झाली 25 टकके तरुणाना चार वर्षांनंतर भारतीय सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळेल. तर बाकीच्या सर्व अग्निवीराना नोकरी सोडवी लग्नार आहे.
भारत प्रथमच सैन्यात अल्प कालावधीसाठी तरुणांची भरती होत आहे.
परदेशातही लष्करात अशा प्रकारच्या भरती होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
केंद्राच्या अग्निपथ योजनेंतर्गत यावर्षी ४६ हजार तरुणांना सशस्त्र दलात सामील करून घेतले जाणार आहे. या योजनेनुसार तरुणांची चार वर्षांसाठी भरती करून त्यांना ‘अग्नवीर’ म्हटले जाईल. अग्निवीरांचे वय 17 ते 21 वर्षे आणि पगार 30 ते 40 हजार दरमहा असेल. या योजनेनुसार भरती झालेल्या तरुणांपैकी २५ टक्के तरुणांना सैन्यात पुढील संधी मिळणार असून उर्वरित ७५ टक्के तरुणांना नोकरी सोडावी लागणार आहे.
आमच्या नवीन वेबसाईटवर भेट द्या
👇👇👇
Tags:
sarkari Yojana