एक जुलैपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार 50 हजार रुपये, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान

 


नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सरकारने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन पर अनुदान रुपये पन्नास हजार एक जुलैपासून देण्याचे जाहीर केले आहे.

दिनांक एक जुलै म्हणजे कृषी दिन या दिनापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णता कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांची प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे. 


दरम्यान दोन हजार सतरा अठरा या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्ण कर्ज पेढे केलेले असल्यास आणि 2018 19 या वर्षातील अल्प मुदत पिक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास तसेच 2019 20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास  50000 रुपयापर्यंत प्रोत्साहन पर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post