नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत असते, असेच नॅनो युरिया हा शेतीमध्ये खर्च कमी करत आहे आणि उत्पन्न वाढवत आहे आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.
देशात खतांच्या किमती भरमसाठ वाढत आहेत मागच्या तीन वर्षात खतांच्या किमतीत 30 ते 40 टक्के ने वाढ झाल्याने रासायनिक खते शेतीसाठी वापरणे कठीण झाले आहे. परिणामी शेतीच्या खर्चात वाढ होऊन शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून इफ्को च्या गुजरात मधील कंपनीने लिक्विड युरिया बनवला आहे.
नॅनो युरिया काय आहे?
नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक युरियाच्या घटकास नॅनो युरिया असे म्हणतात. पारंपारिक युरियाला पर्याय म्हणून नॅनो युरिया वापरला जाणार आहे. नॅनो युरिया पारंपारिक युरिया चा 50 टक्के वापर कमी करू शकतो. नॅनो लिक्विड युरिया पूर्णपणे भारताने विकसित केलेले उत्पादन आहे
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 100% अनुदान, असा करा अर्ज.
पाण्याचे सुरुवात असणारा नॅनो युरिया पिकांच्या पानावर थेट फवरता येणार आहे. पिकांना पूर्वीसारखे जमिनीतून युरिया पोहोचण्याची गरज उरणार नाही. पारंपरिक पद्धतीत 70 टक्के युरिया पिका पर्यंत न पोहोचता जमिनीत मुरून बसतो किंवा हवेत उडून जातो. त्यामुळे जमीन ऍसिडिक बनते आणि नापिक होते. परंतु जमिनितील युरियाला हा घालण्यासाठी संशोधकांनी द्रवरूप आतील नॅनो युरिया विकसित केला आहे. नॅनो युरिया ड्रोनच्या माध्यमातूनही पिकावर फवारतात येणार आहे.
नॅनो युरिया या पिकांच्या पोषणासाठी प्रभावी असून तो पिकाची उत्पादन क्षमता वाढवतो. नॅनो युरिया वापरामुळे युरिया वरील खर्च कमी होतो आणि शेतीचा खर्च कमी झाल्यामुळे नफा वाढतो.
नॅनो युरिया बाटली स्वरूपात मिळणार असल्याने खतांच्या साठवणे की साठी लागणारे गोदाम वाहतूक आधीच्या खर्चात बचत होऊ शकते. नॅनो युरियाची अर्धा लिटरची बाटली 240 रुपयांचे आहे म्हणजे पारंपारिक दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना मिळणार आहे येत्या काळात देशभरात असे आणखी आठ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत चालू आर्थिक वर्षात पाच कोटी बाटल्यांची उत्पादन करण्याचे लक्ष ठेवते.
आमची सरकारी नोकरी विषयक वेबसाईट
👇👇👇