नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे या योजनांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणजे पी एम किसान सन्मान योजना शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये शासन देते. तसेच शासनाने शेतकऱ्यांना उतारवयात पेन्शन मिळावी म्हणून पीएम किसान मानधन योजना आणले आहे या योजनेचे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते.
PM किसान मानधन योजना
पंतप्रधान किसान मानधन योजना ही एक पेन्शन योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते. तसेच जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभधारक आहेत. त्यांना मिळणारे rs.2000 मधून महिना ठराविक रक्कम कपात केली जाते आणि याच रकमेवर त्यांना उतारवयात पेन्शन दिली जाते. सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.
शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू कशी करावी
शेतकरी मित्रांनो पेन्शन योजना चालू करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या योजनेची सविस्तर माहिती घेऊ शकता.
👇👇👇