Ration Card Add New Member नमस्कार मित्रांनो, आपल्या देशामध्ये रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड मुळे लोकांना स्वस्त धान्य मिळते. कोरोणा काळामध्ये सरकारने रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित केले होते. आज आपण या लेखामध्ये रेशन कार्ड मध्ये नाव कसे वाढवावे हे जाणून घेणार आहोत.
कुटुंबामध्ये नवीन बाळ जन्माला आल्यानंतर आणि घरामध्ये सून आल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड मध्ये नाव वाढवावे लागते. त्यामुळे या नवीन सदस्यांना स्वस्त धान्य मिळते तसेच इतर अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया रेशन कार्ड मध्ये नाव कसे वाढवावे.
रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
घरातील नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सुनेचे आधार कार्ड
- पतीचे आधार कार्ड
- विवाह प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
घरातील नवीन बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी कागदपत्रे
- मुलाचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांच्या आधार कार्ड
- रेशन कार्ड
रेशन कार्ड मध्ये नाव या पद्धतीने जोडा
१. यासाठी तुम्ही प्रथम राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या वेबसाईटला भेट द्या.
२. यानंतर होम पेजवर जा आणि एका व्यक्तीचे नाव जोडा.
३. यानंतर पुढील मागितलेली सर्व कागदपत्रे सबमिट करा.
४. यानंतर सर्व माहितीची पडताळणी करा.
५. यानंतर काही दिवसात त्या नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत जोडले जाईल.
महाराष्ट्र राज्याची अन्नपुरवठ्याच्या वेबसाईटची लिंक आम्ही खाली देत आहोत त्यावर जाऊन तुम्ही घरातील सदस्याचे नाव जोडू शकता.
Tags:
ration card updates