1880 सालापासून चे जुने सातबारा, खाते उतारा आणि फेरफार ऑनलाईन कसे काढायचे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती


नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेत जमिनीचा व्यवहार करत असताना त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे आवश्यक असते. जसे की, ती जमीन मूळ कोणाच्या मालकीची होती नंतर त्यामध्ये काय बदल झालेत ही माहिती. पहिले हे सर्व जुने अभिलेख फक्त भूमी अभिलेख च्या ऑफिसमध्ये जाऊन काढावे लागायचे परंतु आता ते ऑनलाईन ही काढता येतात. आज आपण हे सर्व जुने अभिलेख ऑनलाईन कसे काढायचे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. 

जुने सातबारा, खाते उतारा आणि फेरफार ऑनलाईन कसे पाहायचे ? 

जुने अभिलेख काढण्यासाठी आम्ही तुम्हाला अधिकृत वेबसाईटची लिंक देत आहोत. यावर तुम्हाला सर्व जुने सातबारा खाते उतारा आणि फेरफार मिळतील 

👇👇👇

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून  घ्यावे लागतील. यासाठी तुम्हाला नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरून युजर आणि पासवर्ड बनवून घ्यावे लागतील. 

शेतकरी मित्रांनो यानंतर तुम्ही नवीन युजर आणि पासवर्ड टाकून लोग इन व्हावे, यानंतर  तुम्हाला जुनेसार्व अभिलेख काढता येतात.


हेही वाचा 






Post a Comment

Previous Post Next Post