मुंबई :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, अखेर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पन्नास हजार रुपये अनुदानाचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानाचे शासन निर्णय सरकारने जाहीर केले आहे. आता शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणारच हे निश्चित झाले आहे.
शासन निर्णय
शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान जाहीर केले गेले आहे. हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार त्याची पात्रता निकष काय आहेत हे आपण या शासन निर्णयात पाहणार आहोत.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना दिनांक 27/07/2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील पूर्णतः कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देणे बाबतच्या योजनेस खालील प्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे याचा तपशील आपण येथे पाहत आहोत.
योजनेचे तपशील
या योजनेस महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना असे नाव देण्यात आले आहे
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी सन 2017 18, सन 2018 19, आणि सन 2019 20, हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे या तीन आर्थिक वर्षात यापैकी कोणतेही दोन आर्थिक वर्षात पीक कर्ज घेऊन नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना आज या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.