अटल पेन्शन योजना म्हातारपणी हक्काची मदतीची काठी कमी गुंतवणुकीत मोठा परतावा

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक पेन्शन योजना आहे. या योजनेमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना वयाच्या साठ वर्षानंतर खात्रीशीर पेन्शन दिली जाते.  



महाराष्ट्र वयाच्या साठ वर्षानंतर आरामशीर जगायचे असेल तर त्यासाठी रिटायरमेंट नंतरची सोय करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे त्यामध्ये छोट्याशा गुंतवणुकी द्वारे म्हातारपणी खात्रीशीर पेन्शन मिळवू शकतात. 

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेमध्ये गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी वयाच्या साठाव्या वर्षानंतर खात्रीशीर पेन्शन मिळते. १८ ते ४० वर्षांमधील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. लाभधारकास वयाच्या साठ वर्षानंतर 1000 रुपयापासून पाच हजार रुपये महिना अशी पेन्शन मिळते


अटल पेन्शन योजना सुरू कशी करावी

अटल पेन्शन योजना कोणत्याही सरकारी बँकेमध्ये जाऊन सुरू करता येते प्रत्येक महिन्याला त्याच बँक खात्यातून कट होतात आणि साठ वर्षानंतर तुम्हाला एक हजार ते पाच हजार पर्यंत पेन्शन मिळते. 


प्रीमियम किती भरावा लागतो

तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यास वयाच्या साठ वर्षानंतर पाच हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील म्हणजे सात रुपयांची गुंतवणूक याचप्रमाणे एक हजार रुपयाचे पेन्शन साठी 42 रुपये दोन हजार रुपये पेन्शन साठी 84 रुपये 3000 रुपयांच्या पेन्शन साठी 126 रुपये आणि चार हजार रुपये पेन्शन साठी महिना 168 रुपये जमा करावे लागतील.


👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


Online Suvidha Kendra

Post a Comment

Previous Post Next Post