ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 50 % अनुदान | महाडीबीटी फार्मर पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सुरू

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल वर ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदानावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे त्यांनी अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.


कृषी यंत्रीकरण उपभियान - ट्रॅक्टर खरेदी अनुदान योजना

शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी सर्व योजना आहेत. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ही एक योजना आहे ज्यामध्ये, सर्व कृषी यंत्रांसाठी अनुदान दिले जाते. अनुदानाची रक्कम शासनाने 45 % ते 55 % एवढी ठेवली आहे. शासन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान देते यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. 

👇👇👇

आवश्यक कागदपत्रे

महाडीबीटी पोर्टल वर ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळण्यासाठी पुढील आवश्यक कागदपत्रे लागतात

1. आधार कार्ड 

2. बँक पासबुक

3. शेतीचा सातबारा आणि खाते उतारा. 


अर्ज कसा करावा

शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. सुरुवातीला शेतकऱ्यांचे प्रोफाइल बनवावे लागते त्यानंतर कृषी यांत्रिकीकरणांमध्ये ट्रॅक्टर हा घटक निवडून अर्ज करावा लागतो.

👇👇👇

महाडीबीटी पोर्टल


Post a Comment

Previous Post Next Post