तलाठ्याच्या सहीची गरज नाही लागणार, असा काढा डिजिटल सातबारा आणि खाते उतारा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सातबारा आणि खाते उतारा काढण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही, तुम्ही तलाठ्याच्या डिजिटल स्वाक्षरी सहित सातबारा आणि खाते उतारा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. 

डिजिटल सातबारा कसा काढायचा ?

डिजिटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर Digital Satbara अस सर्च कराव लागेल. यानंतर सर्च रिझल्ट मध्ये तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in ही वेबसाईट येईल. ही महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट आहे. 

या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला दोन पर्यायाने लॉग इन करता येते पहिल्या पर्यायामध्ये नोंदणी करून युजर आणि पासवर्ड बनवून घ्यावा लागेल. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही फक्त मोबाईल वर otp घेऊन लॉग इन करू शकता.


पुढे तुमच्या समोर आपला सातबारा नावाने एक पेज ओपन होईल या पेज वर Digital Satbara, Digital Sighned 8/A, Recharge Account, Payment History हे ऑप्शन येतील. यातल्या Digital Sighned 7/12 या पर्यायावर क्लिक करा. 


यानंतर डिजिटल सातबारा काढण्यासाठी प्रत्येक उतार्यासाठी 15 रुपये भरावे लागतात त्यासाठी रिचार्ज करावे आणि digital satbara डाऊनलोड करून घ्यावे. 





Post a Comment

Previous Post Next Post