Pradhan Mantri Fasal Bima Yojana प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम योजना 2016 पासून राबविण्यात येत आहे. पिक विमा मध्ये शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळते. अनिश्चित निसर्गामुळे शेती पिकांचे नुकसान भरून काढता यावे यासाठी पिक विमा योजना शासनाने सुरू केले. सध्या चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी पिक विमा योजनेस मंजुरी देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. जरी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नुकसान झाले तरी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखले जावे यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.
योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी
खरीप हंगाम - ज्वारी, बाजरी, नाचणी मूग उडीद तुर मका भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, कांदा, भात
रब्बी हंगाम - गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा.
शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना यावर्षी बीड पॅटर्ननुसार राबवण्यात येणार आहे याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 ही आहे. या योजनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी आम्ही शासकीय जीआर खाली देत आहोत.