दरमहा तीन हजार रुपये पेन्शन | प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत अशाप्रकारे करा अर्ज

 श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र शासनाची एक पेन्शन योजना आहे ज्यामध्ये कष्ट करणारे मजूर छोटे व्यवसायिक यांना रिटायरमेंट नंतर तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते. 


केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी वयाच्या साठ वर्षानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना हे आहे. या योजनेमध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मजुरांचा यामध्ये समावेश होतो जसे की, मजूर वीट भट्टी पादत्राने बनवणारे कामगार कचरा वेचणारे घरगुती काम करणारे कपडे धुणारे रिक्षाचालक जमीन नसलेले मजूर विडी कामगार रोजंदारी कामगार यांना पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच मासिक पंधरा हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मजुरांना या योजनेत समाविष्ट केले जाईल. 


ही योजना सुरू कशी करावी

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना या योजनेमध्ये मजुरांना स्वतःची नोंदणी करावी लागेल सरकारी आकडेवारीनुसार देशभरात सुमारे 42 कोटी मजूर काम करतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराची वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असायला हवी आणि साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये गुंतवावे लागतील कामगाराचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन सुरू होईल. 


अर्ज कसा करावा

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी maandhan.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर प्रोसीड वर क्लिक करून जनरेट ओटीपी वर क्लिक करा आता अर्जाचे पान उघडले जाईल यानंतर  सर्व माहिती अर्ज करा. 


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

Previous Post Next Post