नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत, करू नका झालेले केसेस मागे घेणे, आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान असे महत्त्वपूर्ण घोषणा देण्यात आल्या.
या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे म्हणाले की, जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आहेत त्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येईल. या निर्णयाचा चौदा लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.
तसेच या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांना विजेच्या बिलात प्रति युनिट एक रुपया सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच ग्रामीण भूमिहीन घरकुल योजनेत मुद्रांक शुल्क 1000 रुपये निश्चित करण्यात आले. तसेच मोजणी शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा :- कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी 80 टक्के अनुदान
या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गणेश उत्सव, दहीहंडी सह कोरोना काळात तरुणांवर झालेल्या छोट्या केसेस मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आले आहे. या योजनेत 60 गाव असून हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे.