शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी सर्व योजना आहेत. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपाभियान ही एक योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यंत्रासाठी 50% ते पण 80 टक्के एवढे अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार खर्चाच्या 50% एवढी रक्कम अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना देते. आज आपण या लेखांमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती घेणार आहोत.
ट्रॅक्टर ट्रॉली 50%अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन यावर जाऊन सर्व योजनांसाठी अर्ज करता येतो. या योजनांमध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ही एक योजना आहे. या योजनेमध्ये सर्व कृषी यंत्रांसाठी अर्ज करता येतो. ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठीही या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो.
महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन यावर गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले प्रोफाईल बनवावे लागत यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती, अशी सर्व माहिती द्यावी लागते. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना अंतर्गत ट्रॅक्टर/ पावर टिलर चलीत अवजारे यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली हा घटक निवडून अर्ज करावा.
आवश्यक कागदपत्रे
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा सातबारा आणि खाते उतारा आधार कार्ड आणि बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्यासाठी लागतात.
निवड कशी होते. लाभ कसा मिळतो
महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची लॉटरी पद्धतीने निवड होते आणि पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे अपलोड करा असा मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जातो. यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्ड बँक पासबुक शेतीचा सातबारा खाते उतारा कोटेशन टेस्ट रिपोर्ट आरसी बुक यासारखी सर्व कागदपत्रे अपलोड करावी. यानंतर कागदपत्रांची छाननी होऊन शेतकऱ्यांची योजनेच्या लाभासाठी अंतिम निवड होते. निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्व संमती पत्र येते पूर्व समिती पत्र आल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी यंत्राची खरेदी करावी आणि मिळालेले जीएसटी सहित बिल अपलोड करावे. बिल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अनुदानाची रक्कम बँक खात्यामध्ये मिळते.