नमस्कार शेतकरी मित्रांनो, विहिरीतील सिंचन मोटार खरेदी साठी सरकार अनुदान देते. या साठी महा डीबीटी या वेबसाईटवर अर्ज सुटले आहेत. या लेखामध्ये आपण विहिरीतील मोटर खरेदी अनुदानासाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
विहीर मोटर अनुदान योजना
शेताला विहिरीचे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरीमध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवावी लागते. हा खर्च प्रत्येक शेतकऱ्यांना परवडणारा नाही. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान चालू केले आहे. त्यांना मोटर खरेदीवर तसेच इतर कृषी सिंचन यंत्रांसाठी अनुदान दिले जाते.
विहीर मोटर खरेदीसाठी सरकार अनुदान देते या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डीबीटी या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कृषी सिंचन या योजनेंतर्गत अर्ज करावा लागतो. तसेच या योजने अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप लाईन आणि डिझेल पंप यासाठीही अनुदान दिले जाते
अर्ज कसा करावा?
विहीर मोटर खरेदीवर अनुदान मिळण्यासाठी महा DBT या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल आपले प्रोफाईल बनवून घ्यावे. यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती शेतीची माहिती आणि पिकाची माहिती इत्यादी सर्व माहिती भरावी. ही माहिती भरल्यानंतर अर्ज करण्यासाठी योजना निवडावी लागते. विहिरीतील मोटर खरेदीसाठी अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला कृषी सिंचन योजना ही योजना निवडावी लागते.
Tags:
Maha dbt Farmer