1 सप्टेंबर पासून या लोकांचे स्वस्त धान्य बंद होणार, नवीन नियम लागू

 

नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे लोक उत्पन्न वाढूनही अंत्योदय योजनेंतर्गत रेशन दुकानातून धान्य घेतात त्या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार आहे. 

या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार

अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंबीय योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की उच्च उत्पन्न असणाऱ्या नागरिकांनी स्वइच्छेने अन्नधान्याचा लाभ सोडायचा आहे. दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत स्वच्छने धान्य सोडण्याचे अर्ज संबंधीत स्वस्त धान्य दुकानदाराकडे किंवा परिमंडळ कार्यालयाकडे जमा करावे. अन्यथा एक सप्टेंबर 2022 पासून उच्च उत्पन्न असणारा, सरकारी किंवा खाजगी नोकरी, सरकारी पेन्शन, कुटुंबातील सर्व सदस्यांची मिळून वार्षिक 59 हजार पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास व्यक्तीचे धान्य बंद करून आजपर्यंत घेतलेले धान्याची वसुली बाजारभावाने करण्यात येईल व शासनाची फसवणूक केल्याबद्दल कार्यवाही करण्यात येईल. शासनाच्या नवीन नियमानुसार उच्च उत्पन्न असणाऱ्या लोकांना स्वस्त धान्य बंद होणार आहे तसेच एक सप्टेंबर पासून त्यांच्याकडून घेतलेल्या स्वस्त धान्यांची बाजारभावाने वसुली होणार आहे. 


या लोकांचे स्वस्त धान्य होणार बंद 






1 Comments

  1. सम्यक माहिती जी जीवनोपयोगी व अत्यावश्यक आहे दैनंदिन जीवनात

    ReplyDelete
Previous Post Next Post