नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान या योजनेचे 50 हजार रुपये रक्कम 15 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव येण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत.
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान
शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी सन 2017 18, 2018 19 आणि सन 2019 20 ही तीन वर्षे विचारात घेण्यात आले आहेत. या तीन वर्षातील कोणत्याही दोन वर्षे जर शेतकऱ्याने नियमित कर्जपेड केले असेल तर त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. दिनांक १ सप्टेंबर पासून बँकांकडून अशा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या महसूल विभागाने मागवल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार बँकांनी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या महसूल विभागाला सादर करायच्या आहेत.