नमस्कार, शेतकरी मित्रांनो महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना या योजने अंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान १५ सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना या योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान ही योजना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने आणले आहे. सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या कालावधीत जे शेतकरी पीक कर्ज घेऊन त्याची नियमित कर्ज फेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
Tags:
50 hajar anudan