
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना राबवली जात असून, आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या समाजातील घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार युवकांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनवणे तसेच ही योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कडून घेतलेल्या कर्जाची व्याज हे सरकार फेडते. या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यवसाय करता कोणत्याही बँकमार्फत घेतलेल्या कर्जावरील 15 लाखाच्या मर्यादेत जास्तीत जास्त पाच वर्षे करता 12% च्या मर्यादित व्याज परतावा मिळतो.
या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकते ?
या योजनेचा लाभ मराठा समाजातील युवक युवतींना मिळेल. लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा. पुरुषांकरिता वयोमर्यादा 50 वर्षे ही राहील तर महिलांसाठी वयोमर्यादा 55 वर्षे आहे.
अर्ज कोठे सादर करावा ?
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेतील कर्ज घेण्यासाठी मराठी युवकांनी या www.udyog.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई द्वारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा. प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सिव्हिल लाईन वर्धा 442001, दूरध्वनी क्रमांक 07152 242756
कोणते कागदपत्र आवश्यक आहेत
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेअंतर्गत उद्योगासाठी कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्र आवश्यक आहेत. रेशन कार्ड, बँक पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचा दाखला, पॅन कार्ड, शेख पाणी प्रकल्प अहवाल ही कागदपत्रे आवश्यक असतात.