ई पिक पाहणी करणे आवश्यक : याशिवाय मिळणार नाही, नुकसान भरपाई

 




E Pik Pahani ई पिक पाहणी हे एक मोबाईल अप्लिकेशन आहे. या एप्लिकेशन ने तुम्ही शेतीच्या सातबारा वर पिकाची नोंद करू शकता. शेतीच्या सातबारावर पिकाची नोंद तलाठी मार्फत होते परंतु यामध्ये अनेक तृटी राहत होत्या म्हणून सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारावर पिकाची नोंद करण्याची सुविधा होण्यासाठी ई पिक पाहणी सुरु केली आहे. 


1 ऑगस्ट २०२२ पासून ई पिक पाहणी करण्यास सुरवात 

शेतकरी मित्रांनो तुमच्या सातबारा वर तुमच्या पिकाची नोंद तुम्ही स्वतः करू शकता. ही सुविधा तुम्हाला ई पिक पाहणी या मोबाईल अप्लिकेशन मुळे मिळणार आहे. खरीप हंगामातील पिकाची नोंद करण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून ई पीक पाहणी सुरू झाले आहे शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून पाहणे ॲप डाऊनलोड करून त्यावर पिकाची नोंद करावी.


ही पिक पाहणे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ई पीक पाहणी का आवश्यक आहे

शेतकरी मित्रांनो सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतीच्या सातबारावर सध्या शेतामध्ये पिकत असलेल्या पिकाची नोंद असणे आवश्यक असते ई पिक पाहणी मोबाईल ॲप वर माहिती भरल्याने सातबारावर पिकाची नोंद चढते त्यामुळे पिक विमा आणि इतर नुकसान भरपाई साठी याचा फायदा होतो.





Post a Comment

Previous Post Next Post