कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज


Kadaba kutti Machine Anudan Yojana 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुपालन व्यवसाय करत असताना कडबा कुट्टी ही मशीन खूप उपयोगी पडते. त्यामुळे शेतकऱ्यांची कडबा कुट्टी मशीन साठी कायमस्वरूपी मागणी असते. ते विचारात घेऊनच शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. 


कडबा कुट्टी मशीन अनुदानावर मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

3HP पर्यंत कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना 16 हजार रुपये ते 20 हजार रुपये पर्यंत अनुदान देत. 

कडबा कुट्टी मशीन खरेदी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन वर अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होते. 

शेतकऱ्यांची कडबा कुट्टी मशीन साठी निवड झाल्यानंतर त्यांना स्वतःची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. यानंतर सर्व कागदपत्रांची छाननी होऊन. शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी पूर्वसमती दिली जाते. 

यानंतर शेतकऱ्यांनी कडबा कुट्टी मशीन खरेदी करावयाची आहे कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्यानंतर मिळालेली बिल ऑनलाइन अपलोड करावी लागतात.  

जीएसटी सहित बिल अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये अनुदान दिले जाते





Post a Comment

Previous Post Next Post