![]() |
Ganesh Utsav 2022 |
जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा म्हणजे गणेश उत्सव, श्री गणेशाचे आगमनाची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. गणेश उत्सव हा वर्षातील सर्वात उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. यंदा गणेश उत्सव दिनांक 31 ऑगस्ट 2022 या गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू होत आहे. 31 ऑगस्ट 2022 ला गणेश चतुर्थीला श्री गणेश देवाची मूर्ती स्थापनेची वेळ आणि मुहूर्त आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
महाराष्ट्रात सर्वात मोठा धार्मिक सण गणेश उत्सव (Ganesh Utsav) साजरा केला जातो. यंदा गणेश उत्सव 31 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. कोरोनामुळे यंदा मूर्तींच्या उंचीबाबतचे निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. शिक्षण विभागाने शाळांना पाच दिवस सुट्टी जाहीर केली आहे. गणेश जन्मोत्सव कधी साजरा केला जाईल आणि गणपतीच्या मूर्तीच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे जाणून घेऊया.
गणेश मूर्तीच्या स्थापनेची वेळ व मुहूर्त येथे क्लिक करा
गणेश उत्सव गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि 10 दिवसांनी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला संपतो. यंदा अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर रोजी येत आहे. त्याच दिवशी गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे.यंदा गणेश स्थापनेचा मुहूर्त सकाळी 11.05 ते दुपारी 1.38 पर्यंत आहे. गणेश चतुर्थीला घरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्याने सुख-शांती लाभते, असे मानले जाते. नशीब प्रबल होते.
गणेशाचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला?
गणेशजींचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला स्वाती नक्षत्र आणि सिंह राशीत मध्यरात्री झाला असे मानले जाते.त्यानुसार यंदा गणेश जन्मोत्सव 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.संहारक, शुभ, सिद्धिद्यक आणि समृद्धी देणारे म्हणून त्यांची पूजा केली जाते. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा विधी करताना सर्वप्रथम गणपतीच्या पूजेचा नियम आहे.धार्मिक मान्यतेनुसार नियमानुसार गणेशाची मूर्ती घरामध्ये किंवा दुकानात स्थापित केल्यास तिथे नेहमी सुख-समृद्धी राहते.