राज्यातील विविध 51 तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
जाहीर केलेल्या तालुक्यांचे तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
उमेदवारांकडून 24 ऑगस्ट ते एक सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात येतील.
नामनिर्देशन पत्रांची छाननी दोन सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत सहा सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल.
त्या ग्रामपंचायत साठी 18 सप्टेंबर 2022 रोजी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वेळेत मतदान होईल
मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल.