नमस्कार शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू झाले आहे दिनांक 15 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. बँकेकडून शासकीय निर्देशानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाकडे सोपवण्याचे काम सुरू झाले आहे. बँकांना पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करत असताना ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याचा आधार कार्ड लिंक नाही अशा शेतकऱ्यांची यादीत नाव टाकने कठीण जात आहे.
शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यास आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. म्हणून शेतकऱ्यांनी बँक खात्याचा आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे. ही प्रक्रिया दिनांक 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांनी करून घ्यायची आहे. तरच त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.