कुकुट पालन योजना पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी सरकार प्रकल्प कर्जाच्या 50% अनुदान म्हणजे जास्तीत जास्त पाच लाख 13 हजार रुपये इतक्या अनुदान देत आहे यासाठी अर्ज कसं करावं याची माहिती आपण येथे घेणार आहोत.
लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून प्राप्त करून घ्यावेत. पशुधन विकास अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या अर्ज जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे सादर करावेत.
आवश्यक कागदपत्रे
फोटो आयडी/ आधार कार्ड / ओळखपत्राची सत्यप्रत /
बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
लाभधारकाकडील मालमत्ता सात बारा व आठ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना 4
कुकुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
अनुसूचित जाती किंवा जमातीच्या अर्जदाराकरता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.