शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील 302 तालुक्यात सदन कुकुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने अर्ज मागवले आहेत. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान म्हणजे पाच लाख 13 हजार रुपये पर्यंत अनुदान पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी सरकार देणार आहे सन 2022 23 साठी याचे अर्ज सुरू झाले आहेत.
कुकुट पालन योजना 2022-23
सजन कुकुट विकास गटाची स्थापना योजनेअंतर्गत एकूण प्रकल्पाची किंमत दहा लाख 27 हजार पाचशे रुपये पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाने 50% अनुदान म्हणजेच पाच लाख 13 हजार 750 रुपये देय असून उर्वरित पन्नास टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करू शकेल.
कुक्कुटपालन योजनेसाठी येथे अर्ज करा
लाभार्थी अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष राहील
लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. सन 2018 19 पासून टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणाऱ्या तरतुदीस आदित राहून योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांसाठी प्रति तालुका एक प्रमाणे निवड करण्यात येणार आहे.
लाभार्थीकडे 2500 चौरस फूट जागा स्वतःच्या मालकीची असावी त्या ठिकाणी दळणवळणाची पाण्याची व विद्युत करण्याची सुविधा उपलब्ध असावी.
प्रकल्प कार्यान्वित करताना शासनाचे अनुदान एकदाच देई असून त्यानंतर प्रकल्प सुरळीत रित्या चालू ठेवून पुढील खर्च संपूर्ण पणे लाभार्थीने करावयाचा आहे.
या योजनेअंतर्गत प्रकल्प उभारण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड स्वतः लाभार्थीने करावयाची असून कर्ज परतफेड ची जबाबदारी शासनाची राहणार नाही.
निवडलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत सदन कुकुट गटाच्या कामाचे व कुक्कुटपालनाची पाच दिवसीय प्रशिक्षण नजीकच्या सदानंद कुकुट विकास प्रकल्पामार्फत घेणे बंधनकारक राहील.
पक्षी ग्रहाचा उपयोग कुकूटपालनासाठीच करणे बंधनकारक राहणार आहे.