माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय महत्वाचा अधिकार आहे. माहिती अधिकार कायद्याने तुम्ही सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातून कोणतीही माहिती मागवून घेऊ शकतो.
माहिती अधिकार अर्ज कसा करावा ?
कोणत्याही शासकीय कार्यालयातून माहिती घ्यावयाची असेल तर अर्ज करण्याचे दोन प्रकार आहेत
१ ऑनलाईन २ कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज देऊन
ऑनलाईन पद्धतीने माहिती घेण्यासाठी आम्ही शासनाची कोणत्याही विभागातून माहिती घेऊ शकता.
माहिती अधिकार अर्ज करण्याच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो. या अर्जाचा नमुना अर्ज पीडीएफ स्वरूपात आम्ही खाली देत आहोत. याप्रमाणे तुम्ही माहिती अधिकाराखाली अर्ज करून आवश्यक माहिती मागून घेऊ शकता.
माहिती अधिकाराखाली तुम्ही कोणत्याही शासकीय विभाग कार्यालयातून आवश्यक ती माहिती मागून घेऊ शकता. आपण कोणती माहिती मागून घेऊ शकतो हे खाली देण्यात आले आहे.
एखादे काम दस्तऐवज, अभिलेख यांची माहिती करणे.
किंवा अभिलेखेचे टिपण्या उतारे किंवा प्रमाणित प्रती घेणे.
सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे
इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती मिळवणे.
तरतुदीनुसार माहिती मिळण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही व्यक्तीस विहित नमुनेनुसार साध्या कागदावर रक्कम रुपये १० रोखीने किंवा डिमांड राखणे भरून किंवा न्यायालय फी मुद्रांकची चिटकवून अर्ज करावा लागतो एखाद्या व्यक्तीकडून अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसात माहिती देणे किंवा सकारण नाकारणे बंधनकारक आहे. अर्जदाराची माहिती पुरवायची आहे त्यातील प्रत्येक प्रतीस रुपये दोन प्रमाणे शुल्क टपाल खर्च आकारण्यात येतो. माहितीच्या दस्तऐवजाची किंमत निश्चित केली असेल तर तेवढी किंमत तसेच प्रॉफिट डिस्क साठी रुपये 50 असे शुल्क आकारले जाते. मुदतीत माहिती न दिल्यास प्रत्येक दिवसाला रुपये 250 प्रमाण जास्तीत जास्त रुपये २५ हजार पर्यंत दंड खातेनिहाय चौकशी होऊ शकते.
.
Tags:
Mahiti Adhikar Arj