मोफत झेरॉक्स मशीन योजना | फक्त या लोकांना मिळणार मोफत झेरॉक्स मशीन | जिल्हा परिषद योजना, असा करा अर्ज, वाचा संपूर्ण माहिती



 Mofat Zerox Machine Yojana नमस्कार मित्रांनो, आपण जिल्हा परिषद योजनांची माहिती घेणार आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात यामध्ये मोफत झेरॉक्स मशीन ही योजना राबवली जाते. मोफत झेरॉक्स मशीन कोणाला दिली जाते यासाठी अर्ज कसा करावा काय पात्रता असते याची माहिती आपण घेणार आहोत.


मोफत झेरॉक्स मशीन योजना पात्रता

दिव्यांग लाभार्थींना मोफत झेरॉक्स मशीन पुरवणे ही योजना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने राबवली जाते. या योजनेमध्ये फक्त दिव्यांग लोकांना झेरॉक्स मशीन वाटप केले जाते. मोफत झेरॉक्स मशीन या योजनेसाठी अर्जाचा नमुना खाली देत आहोत.

अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत झेरॉक्स मशीन योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.


विहित नमुन्यातील अर्ज

लाभार्थी 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असले बाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्रांची छायांकित प्रत

लाईट बिल

लाभार्थी गरजू पात्र व बेरोजगार असले बाबत तसेच लाभार्थीने सुचित केलेली जागा मध्यवस्तीत असून व्यवसाय करणे योग्य असले बाबत ग्रामसेवक दाखला

रेशन कार्डची झेरॉक्स प्रत

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत असले बाबत तहसीलदार यांचा दाखला.

ग्रामपंचायत ग्रामसभा किंवा मासिक सभेचा ठराव

18 ते 65 वयोगटातील असले बाबत शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित छायाप्रत.

बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत.

 

अर्ज कोठे सादर करावा

मित्रांनो आवश्यक पात्रता असल्यास तुम्ही मोफत झेरॉक्स मशीन मिळण्यास अर्ज करू शकता हा अर्ज तुम्ही जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन करायचा असतो.






Post a Comment

Previous Post Next Post