पीएम किसान ई-केवायसी
पी एम किसान योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन मिळते. या योजनेमध्ये असलेले बोगस शेतकरी यांची पडताळणी करता यावी यासाठी शासनाने आधार ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. पीएम किसान केवायसी करण्यासाठी या अगोदर अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. आता शासनाच्या निर्देशानुसार 31 ऑगस्ट ही शेवटची मुदतवाढ आहे. त्यामुळे पीएम किसान आधार ई-केवायसी झाली आहे की नाही हे तपासणे, आणि झाली नसेल तर केवायसी करणे खूप गरजेचे आहे.
ई-केवायसी झाली आहे की नाही येथे क्लिक करून तपासा
पीएम किसान केवायसी झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिक अधिकृत वेबसाईट www.pmkisan.gov.in वर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्यानंतर ही केवायसी या ऑप्शनवर क्लिक करावे. यानंतर आधार नंबर टाकावा. आधार नंबर टाकल्यानंतर जर केवायसी झाली असेल तर ekyc is already done असा मेसेज येईल. असा मेसेज येत असेल तर समजावे की केवायसी झाले आहे. आणि जर मोबाईल नंबर टाकण्यासाठी विचारले तर केवायसी राहिली आहे असे समजावे. मित्रांनो पीएम किसान ई - केवायसी करायची राहिली असेल तर 7 September 2022 अखेर पीएम किसान केवायसी करणे आवश्यक आहे.