पीएम किसान योजना ई - केवायसी करण्याची शेवटची मुदत आली,


PM Kisan Yojana E KYC नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. शासनाचे निर्देशानुसार या योजनेतील लाभार्थ्यांना आधार ई - केवायसी करणे बंदनकारक आहे. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे, परंतु अजूनही काही शेतकरी केवायसी करण्याचे राहिले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आता 31 ऑगस्ट 2022 ही अखेरची मुदत देण्यात आली आहे. या तारखेच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी आपली ही केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. 


31 ऑगस्ट 2022 केवायसी करण्याची शेवटची मुदत 

पीएम किसान योजना या योजनेतून शेतकरी दरवर्षी सहा हजार रुपये मानधन मिळवतात. या योजनेमध्ये काही गैरव्यवहार होऊ नये यासाठी शासनाने आधार ई - केवायसी सुरू केली. बरेच शेतकऱ्यांनी आपली आधार ई-केवायसी  पूर्ण केली आहे परंतु काही शेतकरी अजून केवायसी करायचे राहिले आहेत, अशा शेतकऱ्यांची केवायसी होणे गरजेचे आहे. 31 ऑगस्ट अखेर या शेतकऱ्यांची केवायसी झाले नाही तर हे शेतकरी या योजनेतून बाहेर काढले जाऊ शकतात.


PM Kisan Yojana यादीत तुमचे नाव पहा 
Post a Comment

Previous Post Next Post