Join WhatsApp Group

हर घर तिरंगा - आपल्या घरी ध्वज फडकवताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्वाची माहिती


आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव साजरा होत आहेत. या आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने येत्या 15 ऑगस्ट ला हर घर झेंडा हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये दि. 13 ऑगस्ट २०२२ ते 15 ऑगस्ट २०२२ यां दिवशी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवायचा आहे. राष्ट्रीय ध्वज फडकावत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची माहिती आपण घेणार आहोत. 

राष्ट्रीय ध्वज फडकवताना घ्यावयाची काळजी 


आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवताना पुढील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. 


हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे सुत, पोलीस्टर, सिल्क खादी, लोकर पासून तयार केलेले राष्ट्र ध्वज वापरावेत 


राष्ट्र ध्वजाचा आकार ३:२ या प्रमाणात असावा. 


केशरी रंग वरच्या बाजूला आणि हिरवा रंग खालील बाजूला या प्रमाणे ध्वज फडकवावा. 


घरो घरी तिरंगा हा 13 ते 15 ऑगस्ट २०२२ या कालावधीत फडवलेला असेल, दररोज सायंकाळी उतरवण्याची आवश्यकता नाही. 


राष्ट्र ध्वज उतरविताना सावधानतेने आणि सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा 


राष्ट्र ध्वज कोणत्याही कारणाने फाटणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक नागरिकांनी राष्ट्र द्वाज संहितेचे पालन करावे. Post a Comment

Previous Post Next Post