सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना ही एक योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाते. दिनांक 4 ऑगस्ट 2022 ला एक नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी अंतर्गत योजना सन 2022 23 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आले आहे.
राज्य पुरस्कृती कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2022-23
राजू पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना चालू झाली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले जात आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर किंवा पावर टिलर चलित अवजारे आणि इतर सर्व कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी सरकार अनुदान देणार आहे.
कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अर्ज कसा करावा येथे वाचा
शासन निर्णय
सन २०२२-२३ या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी माहे जून ते ऑगस्ट 2022 या महिन्याकरता रुपये ८४ कोटी आयुक्तांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सुदरनिधी 22 23 करता खालील लेखन शीर्षा खाली अर्थसंकल्पीत केलेल्या तरुणीनुसार खर्ची टाकावा.
वरील शासन निर्णय सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या शासन निर्णयात असे समजते की सन 2022 23 या वर्षात राजे पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 84 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे.
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये शेतकरी खालील कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान मिळवू शकतात.
ट्रॅक्टर
पावर टिलर
ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलीत अवजारे
मानव चलित अवजारे
यंत्रचलित अवजारे
शेतकरी मित्रांनो, या योजनेमध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान मिळू शकतात यासाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो.