घरगुती वापरासाठी असलेले सोलर पॅनल म्हणजेच rooftop solar panel Yojana नवीन अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेमध्ये घरावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमध्ये अनुदान किती मिळणार आणि अर्ज कोठे करावा ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.
Rooftop solar panel Yojana
घराच्या छतावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. घरावरील सोलर पॅनल बसवल्याने घरगुती लागणारी वीज संपूर्णपणे मोफत वापरता येते. म्हणजेच एकदा सोलर पॅनल बसवला की घरगुती वापरायची संपूर्ण वीज कायमस्वरूपी मोफत मिळू शकते.
अनुदान किती मिळते.
लोकांनी आपल्या घरावर सोलर पॅनल बसवून विजेची बचत करावी यासाठी शासनाकडून त्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.
शासनाकडून एक किलो वॅट ते तीन किलो वॅट पर्यंत सोलर पॅनल बसवण्यासाठी 40 टक्के अनुदान दिले जाते
चार किलो वॅट ते दहा किलो वॅट पर्यंत सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाते.
घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येते क्लिक करा