शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यात ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळवता येते. या योजनेचे सन 2022 23 साठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत. तसेच शासनाच्या जीआर नुसार या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत याची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज कसा करावा
ट्रॅक्टर तसेच इतर कृषी यांत्रिकरणाच्या खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले जातात. सध्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि इतर कृषी अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जात आहेत.
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज करण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन हे शेतकऱ्यांचे पोर्टल आहे या वेबसाईटवर सर्व कृषी योजनांसाठी अर्ज करता येतो. तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ज करायचा असेल तरीही तुम्ही या पोर्टलवर अर्ज करू शकता.
ट्रॅक्टर योजनेत झालेले महत्त्वाचे बदल
ट्रॅक्टर अनुदानित योजनेत अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किमान सहा वर्षे आणि ट्रॅक्टरचलित अवजारांची किंवा तीन वर्षे विक्री करता येणार नाही
एका लाभार्थ्यास ट्रॅक्टर सोबत अनुदानावर ट्रॅक्टर चलित अवजारे घ्यावयाचे असल्यास जास्तीत जास्त तीन अवजारे किंवा रुपये एक लाख अनुदान रकमेपर्यंत जेवढी अवजारे येतील तेवढी या दोन्हीपैकी जे कमी असेल त्या मर्यादित अनुदान देय राहील.
कृषी अवजारे बँक या बाबींचा लाभ घेतलेल्या वैयक्तिक लाभार्थ्याची निवड पुढील आर्थिक वर्षात एखाद्या यंत्र अवजारांसाठी झाले असेल आणि ते यंत्र आवजारे यापूर्वी लाभ दिलेल्या कृषी अवजारे बँकेमध्ये समाविष्ट असेल तर ते यंत्र अवजारांसाठी किमान एक पाच वर्षे अनुदान देणे राहणार नाही.
ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर नसेल अशा शेतकऱ्यांना देखील ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
एखाद्या शेतकऱ्याने नजीकच्या तालुक्यातून अवजारांची खरेदी केली असल्यास व खातर जमा करण्यासाठी आवश्यकता भासल्यास त्याबाबतची माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून घेण्यात यावी.