50 हजार रुपये अनुदान योजना वेबसाईट सुरू, पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहता येणार

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान योजनेची पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे आता ही यादी तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे. हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. आता यासाठी ऑनलाईन वेबसाईट ही सुरु झाली आहे.

50 हजार रुपये अनुदान योजना वेबसाईट सुरू
50 हजार रुपये अनुदान योजना या योजनेची वेबसाईट सुरू करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान शासनाने जाहीर केले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काही दिवसात जमा करण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची निवड ही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांची नावे यादीमध्ये कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये बघता येणार आहेत. या याद्या आता ऑनलाइन ही जाहीर करण्यात आले आहेत. यासाठी जी वेबसाईट आता सुरू झाली आहे.



शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचे नाव ऑनलाईन पहायचे असल्यास आणि तुम्ही पात्र असाल तर केवायसी करायची असल्यास तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जावे लागेल. तिथे तुम्ही ऑनलाईन यादी मध्ये तुमचे नाव आहे का हे तपासून घेऊ शकता. तसेच तुम्ही उद्या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हालाही केवायसी ही करून घ्यावी लागेल.




Post a Comment

Previous Post Next Post