Join our WhatsApp group

पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांची यादी आली, असे पहा यादीत तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान शेतकऱ्यांना जाहीर झाले आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. अशा पात्र लाभार्थीची यादी जाहीर करण्यात आले आहे. या यादीत तुमचे नाव आहे का नाही? हे कसे चेक करायचे याची माहिती आज आपण घेणार आहोत.


शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान योजना

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहीर केले आहे. 2017 18, 2018 19, आणि 2019 20, या तीन आर्थिक वर्षातील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन विहित कालावधीत कर्जफेड केले असल्यास ते शेतकरी 50 हजार रुपये अनुदान मिळण्यास पात्र आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला असेल ते शेतकरी फक्त या योजनेस पात्र होऊ शकत नाहीत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे.


पन्नास हजार रुपये अनुदान यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये या याद्या लावण्यात आल्या आहेत तुम्ही बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे का हे तपासून घेऊ शकता तसेच जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला सीएससी सेंटर मध्ये केवायसी करावी लागणार आहे. केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post