पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, अखेरचा शासन निर्णय आला

नमस्कार शेतकरी मित्रांनो, 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा शेवटचा जीआर दिनांक 16 सप्टेंबर 2022 ला जाहीर करण्यात आला आहे. अनुदानाच्या यादीमध्ये आपले नाव कसे पाहायचे? पुढे काय प्रक्रिया असेल याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात

सर्व शेतकरी बांधवांसाठी, आनंदाची बातमी आहे. पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा शेवटचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांन पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान योजना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केले आहे. या योजनेमध्ये 2017 18, 2018 19, 2019 20, या तीन आर्थिक वर्षातील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात नियमित कर्ज घेऊन विहित कालावधीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे. या योजनेचा अखेरचा शासन निर्णय काल दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला. या शासन निर्णयाने, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच अनुदानाची रक्कम जमा होईल हे निश्चित झाले आहे. तसेच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.


50 हजार रुपये अनुदान पात्र  शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


50000 प्रोत्साहन पर अनुदान योजनेबाबतचा शासन निर्णय

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना या योजनेसाठी नीती वितरित करणे बाबत शासन निर्णय काल दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झाला आहे. या शासन निर्णयानुसार, सन 2022 23 ही आर्थिक वर्षात, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रुपये 2,350 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना या योजनेसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.


वरील शासन निर्णयानुसार समजते की, 2350 कोटी रुपये इतका निधी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आले आहे. जरी बँकेमध्ये यादी नसेल तरी लवकरच बँकेमध्ये यादी लावण्यात येईल. यादीमध्ये नाव असल्यास तुम्ही केवायसी ची प्रोसेस करून घ्यावयाची आहे.


Post a Comment

Previous Post Next Post