Join WhatsApp Group

50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आली, असे पाहा यादीत तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे, आता तुम्ही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे तपासू शकता. या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे कसे पाहायचे याची माहिती, आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. 


पन्नास हजार रुपये अनुदान पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर

सर्व शेतकरी मित्रांसाठी, खूप आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी पात्र लाभार्थी यादी येण्याची प्रतीक्षा करत होते. आता ही यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजार प्रोत्साहन पर अनुदान योजना सरकारने जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, 2017-18, 2018-19, आणि 2019-20 या तीन आर्थिक वर्षातील सलग दोन वर्षे, बँकेच्या नियमानुसार विहित कालावधीत शेतकऱ्याने कर्जफेड केली असल्यास, त्याला 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार नाही. 



नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना, सरकारकडून काहीतरी अनुदान मिळावे, या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेचे नाव, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपुरा अनुदान असे देण्यात आले. या योजनेचे निकष निश्चित करताना, 2017 18, 2018 19, 2019 20 हे तीन आर्थिक वर्ष निवडले गेले. या तीन आर्थिक वर्षांतील कमीत कमी सलग दोन वर्षे शेतकऱ्याने कर्ज घेऊन विहित कालावधीत कर्जफेड केली असल्यास तो शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे. या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होईल. शासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बनवली आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र असाल, तर सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव आहे का हे तपासून घेऊ शकता. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जावे लागेल. शासनाने या याद्या बँकेमध्ये जाहीर केले आहेत. लवकरच या याद्या शासनाच्या वेबसाईटवरही पाहायला मिळतील. सध्या तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जाऊन तुमचे यादी मध्ये नाव आहे का हे पाहू शकता. 


आमचा WhatsApp Group जॉईन करा.

Post a Comment

Previous Post Next Post