नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची नोंद कारखान्याला करावी लागते, तेव्हा ऊस कारखान्याला जातो, परंतु असे बऱ्याच वेळा होते की, कारखान्याकडून ऊसतोड येतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात नाही, याला पर्याय म्हणून सरकारने एक ऑनलाईन एप्लीकेशन आणले आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतातील ऊसाची नोंद साखर कारखान्याला तुमच्या मोबाईलवर करू शकता. या मोबाईल अप्लिकेशन चे नाव महा-ऊस नोंदणी असे आहे.
महा-ऊस नोंदणी एप्लीकेशन
साखर आयुक्त कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी ऊस पिक नोंदणीसाठी महा ऊस नोंदणी ॲप तयार करण्यात आले आहे. या मार्फत ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंद करणे शक्य नाही असे शेतकरी या मोबाईल एप्लीकेशन मार्फत स्वतःच्या शेतातील उसची नोंद करू शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात ऊस नोंद केली आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती या अँप्लिकेशन मध्ये दिसून येणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी करूनही ऊस तोडणी असल्याने हे ॲप्लिकेशन बनवण्यात आले आहे. तूच नोंदणी बाबत देणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे.
महा ऊस नोंदणी एप्लीकेशनवर उसाची नोंद कशी करावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags
maha ua nondani