Property Card Online : डिजिटल स्वाक्षरीच प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन काढा, तुमच्या मोबाईल वरून, या पद्धतीने फक्त पाच मिनिटात

प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक. महाराष्ट्र सरकारनं आता डिजिटल स्वाक्षरीतलं प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाहीये. तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ते काढू शकता. ते कसं काढायचं, त्यासाठी किती फी आकारली जाणार आहे, याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.


नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रॉपर्टी म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक ऑनलाइन पद्धतीने कसे काढायचे याची माहिती आपण येथे घेत आहोत. प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in हे महाराष्ट्र सरकारचे अधिकृत वेबसाईट. या वेबसाईटवर तुम्ही काही मिनिटांमध्ये तुमचे प्रॉपर्टी कार्ड काढू शकता. यासाठी तुम्हाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही.


प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी या वेबसाईटवर तुम्हाला तुमचे प्रोफाईल बनवावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन व्हावे. लॉगिन झाल्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी कार्ड काढू शकता. डिजिटल स्वाक्षरी चे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी 45/- रुपये एवढा खर्च येतो.

Post a Comment

Previous Post Next Post