दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना असा करा अर्ज

 

Dindayal padhyay Gramin Kaushalya Yojana दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना, ही योजना ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेले आहे. या योजनेअंतर्गत एस सी, एसटी, आणि अल्पसंख्यांक प्रवर्गातील लोकांसाठी सरकार मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देते. हे प्रशिक्षण सुरू असताना त्यांची राहण्याची आणि जेवणाची ही सोय शासन करत असते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहेत.

पात्रता

दहावी पास

वयोमर्यादा 28 ते 26 वर्ष

दारिद्र रेषा कुटुंबातील लाभार्थी उमेद बचत गट सदस्य रेशन कार्ड धारक रोजगार हमी कार्डधारक

ग्रामसभा ठराव दाखला 


आवश्यक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला

आधार कार्ड 

ग्रामपंचायत चा रहिवासी दाखला

पासपोर्ट साईज फोटो

जातीचा दाखला

नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स

फिटनेस सर्टिफिकेट

कोविड लसीकरण सर्टिफिकेट

पॅन कार्ड


प्रशिक्षण कोठे मिळते

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे सेंटर असतात. तुमच्या जवळचे सेंटर कुठे आहे याची चौकशी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्येही करू शकता. येथे एक ऑक्टोबर पासून नवीन बॅचेस सुरू होत आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊ शकता येथे राहण्याची आणि जेवणाची सोय ही केलेली असते.

Post a Comment

Previous Post Next Post