गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तीन दिवस जेष्ठा गौरींचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रात याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पुजन असेही म्हटले जाते. स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी यासह कुटूंबात सुख समृद्धीसाठी हा उत्सव साजरा केला जातो. ज्येष्ठा गौरी पूजन हे नक्षत्र आधारित पूजन आहे . भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन , ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर उस्थापन (विसर्जन) असते. यासाठी प्रत्येक दिवसाच्या पुजनासाठीचे मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत.
ज्येष्ठा गौरी आवाहन : 3 सप्टेंबर 2022, शनिवार
मुहूर्त : सुर्योदयापासून रात्री 10.56 वाजेपर्यंत
********************
ज्येष्ठा गौरी पूजन : 4 सप्टेंबर 2022, रविवार
पूजन मुहूर्त : सकाळी 06.00 वाजेपासून सायंकाळी 06:39 वाजेपर्यंत
*************
ज्येष्ठा गौरी विसर्जन : 5 सप्टेंबर 2022, सोमवार
उस्थापन (विसर्जन) मुहूर्त : सकाळी 06.01 वाजेपासून ते 08.30 वाजेपर्यंत