पद्मभूषण पुरस्कृत, परमाणु वैज्ञानिक जेष्ठराज जोशी यांची मसूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट

मसूर : पद्मभूषण पुरस्कृत रसायन अभियंता, परमाणु वैज्ञानिक, सल्लागार आणि शिक्षक असलेले श्री. ज्येष्ठराज जोशी हे जन्मभूमी असलेल्या मसूर गावी आले होते. यावेळी त्यांनी मसूर ग्रामपंचायतीला आवर्जून भेट दिली आणि मसूर गावच्या प्रगतीचा आढावा घेतला.  तसेच मसूर गावच्या नियोजित विकास प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.


ज्येष्ठराज भालचंद्र जोशी हे एक महान रसायन अभियंता, परमाणु वैज्ञानिक, सल्लागार आणि शिक्षक आहेत. त्यांच्या अभियांत्रिकी विज्ञानातील योगदानासाठी त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच रसायन अभियांत्रिकी आणि परमाणु विज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून 2014 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठराज जोशी यांची जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील मसूर हे गाव आहे. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मसूर भूमी, अनेक कर्तबगार महापुरुषांची जन्मभूमी आहे. पद्मभूषण पुरस्कृत जेष्ठराज जोशी यांचीही जन्मभूमी मसूर हीच आहे. ज्येष्ठराज जोशी यांनी आपल्या जन्मभूमी असलेल्या मसूर गावाला भेट दिली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आणि समाधान होते. 

यावेळी त्यांनी मसूर ग्रामपंचायतीलाही भेट दिली. मसूर गावचे माननीय सरपंच श्री पंकज दीक्षित यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही आल्या होत्या, त्यांनाही उपसरपंच श्री विजयसिंह जगदाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मानसिंगराव जगदाळे (साहेब) उपस्थित होते. मा. जगदाळे साहेबांनी, ज्येष्ठराज जोशी यांना मसूर गावच्या नियोजित विकास प्रकल्पांची माहिती दिली. साहेबांनी, सातारा जिल्ह्यातील पहिला, प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प जो मसूर मध्ये उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची माहिती दिली आणि  जोशी सर यांच्यासोबत विचारविनिमय केले. 

मा. मानसिंगराव जगदाळे (साहेब) व मा. जेष्ठराज जोशी सर
मसूरच्या विकास प्रकल्पांंविषयी चर्चा करत असताना 

मा. ज्येष्ठराज जोशी यांनीही खूप उत्साहाने मसूरच्या विकास प्रकल्पांची माहिती घेतली आणि हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. यावेळी मसूर गावचे लोकनियुक्त, उच्चशिक्षित सरपंच श्री पंकज दीक्षित, यांनी ज्येष्ठराज जोशी यांना मसूर गावच्या उज्वल ऐतिहासिक परंपरेची आणि यशोगाथेची चित्रफीत दाखवली. या कार्यक्रमास, माननीय उपसरपंच विजयसिंह जगदाळे, मसूरचे ग्रामविकास अधिकारी श्री विकास पाटील, डॉक्टर रमेश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रमोद चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री कैलास कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मसूर गावचे नेते सातारा जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मानसिंगराव जगदाळे साहेब यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. 







by श्री. गणेश भिसे
     संगणक परिचालक ग्रामपंचायत मसूर

Post a Comment

Previous Post Next Post