नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची नोंद साखर कारखान्याला करता यावी यासाठी महा ऊस नोंदणी हे मोबाईल ॲप बनवण्यात आले आहे. हे मोबाईल ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून सहजरीत्या डाउनलोड करू शकता. तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोअर वर जाऊन महा उस नोंदणी असे सर्च करायचे आहे. सर्च रिझल्ट मध्ये महा उस नोंदणी हे ॲप्लिकेशन येते. हे डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावे. महा ऊस नोंदणी ॲप मोबाईल मध्ये घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतातील उसाची नोंद साखर कारखान्याला करू शकता. या मोबाईल ॲप ने उसाची नोंद कशी करायची हे समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.