वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी सरकार रुपये 12000 अनुदान स्वरूपात देते या योजनेची सुरुवात झाली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लोकांना मोफत शौचालय बांधून दिले जातात. राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करण्याची सुविधा शासनाने दिले आहे. या लेखांमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
मोफत शौचालय योजना बारा हजार रुपये अनुदान
स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना शौचालय देण्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत. या प्रणाली द्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता रुपये बारा हजार अनुदान देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागात असाल आणि, तुमच्याजवळ वैयक्तिक शौचालय नसेल तर तुम्ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोफत शौचालय बांधून घेऊ शकता. सध्या या योजनेच्या अर्ज सुरू आहेत. खाली लिंक दिली गेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होऊन तुमची ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.